Nashik News : मोक्क्यातील संशयितांची विषप्राशन करीत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Nashik News : मोक्क्यातील संशयितांची विषप्राशन करीत आत्महत्या

नाशिक : सातपूर मधील वर्चस्ववादातुन सराईत गुंडांनी भाजपच्या कामगार मोर्चाचे पदाधिकारी विक्रम नागरे यांच्याकडे खंडणी मागून त्यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी दगडफेक केली होती. या प्रकरणी संशोधन विरोधात गुन्हा दाखल करून मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती.

यातीलच एका संशयिताने घोटी नजीक भरविर या ठिकाणी विष प्राशनकरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या संशयिताने दोघा माजी नगरसेवकांमुळे आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटल्याचे समजते. मात्र याबाबत घोटी पोलिसाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. (Suspects commit suicide by poisoning Nashik News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Dhule News : पोलिसांकडून मांजा साठा जप्त; 2 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

अनिरुद्ध शिंदे असे मयताचे नाव असून, मोक्का लावल्याने तो फरार होता. अनिरुद्ध याने घोटीतील भरविर या ठिकाणी मुक्काम ठोकला होता, तिथेच विषप्राशन केले. त्याला घोटी रुग्णालयात दाखल केले असता, मंगळवारी (ता. २७) सकाळी मृत्यू झाला. अनिरुद्धने मृत्यूपूर्वी भाजपच्या दोन माजी नगरसेवकांची नावे ‘सुसाइट नोट’ मध्ये लिहिल्याचे समजते. मात्र, या प्रकरणी घोटी पोलिसांनी मौन बाळगल्याने अनिरुद्धच्या आत्महत्येमागील कारणाचे गूढ वाढले आहे.

नागरे यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार दीपक भालेराव ऊर्फ ‘डी’ भाई, रोशन काकड, गणेश लहाने, गौरव ऊर्फ गुलब्या घुगे, अनिरुद्ध शिंदे, जया दिवे यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तत्कालीन पोलिस आयुक्तांनी राजकीय दबावातूनच संशयितांवर रातोरात मोक्का लावल्याचीही चर्चा होती. मोक्का लावल्यानंतर फरार असलेला संशयित अनिरुद्ध शिंदे या मूळगावी राहत होता.

चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यात अडकविण्यात आल्याच्या नैराश्यातून अनिरुद्ध याने आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. यावेळी त्याच्या नातेवाइकांनी आक्रोश करुन आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु, पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही कार्यवाही केली नव्हती. ‘सुसाइट नोट’ बाबत पोलिसांनी मौन बाळगले आहे.

हेही वाचा: Nashik ZP News : आर्थिक अधिकाराअभावी झेडपीचे कामकाज ठप्प