esakal | मालेगावात खळबळ; तब्बल 10 शिक्षकांचे एकाच वेळी निलंबन
sakal

बोलून बातमी शोधा

teachers

मालेगाव : तब्बल 10 प्राथमिक शिक्षकांचे एकाच वेळी निलंबन

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : महापालिका शिक्षण मंडळाच्या दहा शिक्षकांना (teachers suspended in malegaon) सोमवारपासून निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मनपा शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी एफ. डब्ल्यू. चव्हाण यांनी याबाबत आदेश काढले. काय घडले नेमके?

दहा शिक्षकांना निलंबित केले

कोरोनाकाळात (coronavirus) संगमेश्‍वर वॉर्ड लसीकरण मोहिमेदरम्यान कोविन ॲपवर ऑनलाइन रजिस्टरचे काम सोपविण्यात आलेल्या दहा शिक्षकांनी रजिस्टर नोंदणीत निष्काळजीपणे काम केले. त्यामुळे राष्ट्रीय कामात अडथळा व निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवून महापालिका शिक्षण मंडळाच्या दहा शिक्षकांना सोमवारपासून निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संगमेश्‍वर केंद्रावरील लसीकरणादरम्यान २ जुलै २०२१ ला १३ लाभार्थ्यांना लस न देता लसीकरण दाखविले आहे. यामुळे लस वापरात तफावत पडल्याने एक व्हायल शिल्लक पडली. चुकीचा अहवाल गेल्याचे महिला वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्य केंद्र यांनी तक्रार करून निदर्शनास आणून दिले. यानंतर संबंधित शिक्षकांकडून आरोग्य विभागाच्या आक्षेपानुसार नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला. खुलासा समाधानकारक नसल्याने चव्हाण यांनी मुंबई प्राथमिक शिक्षण नियम १९४९ चे कलम ७० (२) अन्वये कर्तव्यात कसूर करून राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याबद्दल, तसेच नागरी वर्तणूक नियमांचा भंग केला म्हणून मुंबई प्राथमिक शिक्षण नियम १९४९ चे कलम ६३ (२) ब अन्वये दहा शिक्षकांना निलंबित केले.

हेही वाचा: आयटी कंपन्यांसाठी महापालिकेचा पुढाकार

या शिक्षकांचा समावेश

जाविद अख्तर मोहम्मद रमजान, अखलाक अहमद एकबाल, खलील अहमद अब्दुल सत्तार, अन्सारी अखलाक अहमद मोहम्मद यासीन, अब्दुल वाहिद शकील अहमद, जमील अहमद शब्बीर अहमद, अन्सारी शफीक अहमद मोहम्मद साबिर, तश्कील अहमद निहाल अहमद, अन्सारी जुल्फकार अहमद महिम्मद इब्राहिम, अन्सारी मोहमदअली शब्बीरअली.

शिक्षकांचे निलंबन आदेश रद्दची मागणी

एकाच वेळी दहा शिक्षकांच्या या निलंबन आदेशामुळे खळबळ उडाली आहे. अखिल भारतीय ऊर्दू शिक्षक संघाचे संस्थापक व सरचिटणीस साजीद निसार अहमद, राज्य उपाध्यक्ष अल्ताफ अहमद मोहंमद युनूस आदींनी निलंबन आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. निलंबन अन्यायकारक असल्याचा आरोप करून सर्व दहा प्राथमिक शिक्षकांचे निलंबन आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. श्री. अहमद यांनी महापालिका आयुक्त, उपायुक्त व मनपा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे.

हेही वाचा: नाशिककरांचा जाहीरनामा विकासाला दिशा देणारा

loading image
go to top