नाशिक शहर बससेवेच्या 28 चालक-वाहकांचे निलंबन; महिलांना मिळणार संधी

नाशिक शहर बससेवेतील २८ चालक-वाहकांचे निलंबन
Nashik City Bus
Nashik City Busesakal

नाशिक : सिटीलिंक कंपनीमार्फत सुरू असलेल्या शहर बससेवा देताना वाहक व चालकांकडून प्रवाशांशी अरेरावी होवू नये, अशा स्पष्ट सूचना असताना प्रवाशांशी उद्धटपणे वागणे, अरेरावी करणे व वाहतूक नियमांचे पालन न केल्याने २८ वाहक व चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, सिटीलिंक बससेवेचा विस्तार वाढवत असताना महिलांचीदेखील वाहक म्हणून नियुक्ती कली जाणार आहे.

प्रवाशांशी सद्भावनाने न वागणाऱ्यांना घराचा रस्ता

महापालिकेकडून गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात शहर बससेवा सुरू करण्यात आली. लॉकडाउन तसेच शैक्षणिक संस्था बंद असल्याने टप्प्याटप्प्याने बस वाढविण्यात आल्या. येत्या काळात अडीचशे बस चालविल्या जाणार आहेत. बससेवेचा व्याप वाढत असताना अधिक दर्जेदार सेवा देण्याबरोबरच प्रवासी सेवेकडे आकर्षित करण्यासाठी प्रवाशांशी सद्भावनाने वागण्याच्या सूचना सिटीलिंक कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. परंतु उद्धटपणा, अरेरावी, तिकीट न देणे, वेळ व नियमांचे पालन न करणे यासंदर्भात प्राप्त तक्रारी व तक्रारींची शहानिशा केल्यानंतर सिटीलिंक कंपनीने अठ्ठावीस चालक व वाहकांना कामावरून काढून टाकले आहे.

Nashik City Bus
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून नाशिकच्या व्यावसायिकाची फसवणूक? गुन्हा दाखल

महिलांनाही मिळणार संधी

कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आल्याने बससेवेचा विस्तार वाढविला जाणार आहे. बससेवा वाढविताना आता चालक व वाहकाच्या रूपात महिलाही दिसून येणार आहे. पहिल्या टप्प्यात २५ महिलांना प्रशिक्षण देऊन १ एप्रिलपासून सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे. तीन टप्प्यांमध्ये शंभर महिलांना वाहक पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. सध्या जवळपास अडीचशे बस आहे. पाचशे चालक व वाहक कार्यरत आहेत. वाहकपदावर महिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला वाहकाबरोबरच नऊ महिला तिकीट तपासणीसांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सिटीलिंक कंपनीचे महाव्यवस्थापक नितीन बंड यांनी दिली.

Nashik City Bus
नव्या व्हेरियंटची नव्याने चर्चा....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com