कोळी समाज निवेदन

कोळी समाज निवेदन
Published on: 
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H32521 धुळे : अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थीनी निहारीका कोळी हिच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करावी या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना देतांना अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे पदाधिकारी. --- विद्यार्थीनी मृत्यूचा निष्पक्ष तपास व्हावा --- अखिल भारतीय कोळी समाजाची मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : अक्कलकुवा (जि. नंदुरबार) येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी निहारीका कोळी हिच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय कोळी समाजाच्या धुळे जिल्हा शाखेने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिक विभागीय आयुक्तांना मागणीचे निवेदन दिले. संशयास्पद मृत्यू झालेली विद्यार्थीनी निहारीका ही हुशार होती. तिच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मृत्यूपूर्वी काही दिवस तिची प्रकृती बिघडली होती. याबाबत पालकांना वेळेवर व पुरेशी माहिती देण्यात आली होती का, याचीही चौकशी करावी, घटनेच्या दिवशी देण्यात आलेली वैद्यकीय मदत, कर्मचारी व अधिकाऱ्यांची भूमिका, पालकांशी झालेला संपर्क, शाळेकडून देण्यात आलेली माहिती तसेच घटनेच्या वेळेबाबतच्या विसंगतींची तपासणी करावी. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, उपस्थिती नोंदी, वसतिगृह रजिस्टर, कॉल रेकॉर्ड, वैद्यकीय कागदपत्रे व औषधोपचारांच्या नोंदी सुरक्षित ठेवून संबंधितांचे जबाब नोंदवावेत आदी मागण्या अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने निवेदनातून केल्या. मागण्यांचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरधर महाले, राज कोळी, दीपक कोळी, गणेश बागूल, हितेश जगदाळे, दिलीप शिरसाट, विलास कोळी आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना दिले. ---
Marathi News Esakal
www.esakal.com