जामफळ धरण न्यूज

जामफळ धरण न्यूज
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- जामफळ धरण जोडणी कामास प्रारंभ - पालकमंत्री रावल : शाश्वत सिंचनाचा ५४ गावांचा मार्ग सुकर सकाळ वृत्तसेवा चिमठाणे, ता. १० : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील ५४ गावांच्या शाश्वत सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘पीडीएन’ योजनेंतर्गत जामफळ धरणाच्या जोडणी (इनटेक) कामाचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा रविवारी (ता. ११) दुपारी चारला जामफळ धरण मुख्य विमोचक (बाभळे फाटा) येथे होणार आहे. - या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात थेट पाइपलाइनद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे. सिंचनाची सुविधा अधिक सक्षम झाल्यामुळे शेती उत्पादनात वाढ होईल आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ७२८ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचे नियोजन आहे. पैकी आतापर्यंत सुमारे ३१० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाला वेगाने गती देऊन आगामी हंगामातच शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रशासकीय व राजकीय पातळीवर निर्धार करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतीला शाश्वत सिंचनाची खात्री मिळून कृषी विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ‘पाणी थेट शेतात, समृद्धी प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात’ या उदात्त ध्येयाधोरणातून राबविण्यात येत असलेली ही योजना शिंदखेडा मतदारसंघाचा कायापालट करणारी ठरणार आहे. ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com