Latest Marathi News | कुटुंबीयांच्या पाठबळावर सुवर्णा चव्‍हाणके यांची Cancerवर मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suvarna Chavanke

कुटुंबीयांच्या पाठबळावर सुवर्णा चव्‍हाणके यांची Cancerवर मात

कोरोना महामारीच्‍या परिस्थितीत आरोग्‍याचा प्रश्‍न गंभीर झालेला असताना या कालावधीत सुवर्णा चव्‍हाणके यांना कर्करोगाचे निदान केले. उत्तरीय तपासण्या केल्‍यानंतर स्‍तनांचा कर्करोगाच्या निदानासोबत यकृताचाही कर्करोग असल्‍याची बाब समोर आली. पण उपचारासाठी डॉक्‍टरांकडे गेल्‍यावर, त्‍यांना पाहताच व संवाद साधताना कर्करोगाविषयीची भीती पूर्णपणे दूर पळाली व यशस्‍वी उपचार करून त्‍यांनी कर्करोगावर मात केली आहे.

सुवर्णा चव्‍हाणके यांना जानेवारी २०२१ मध्ये कर्करोगाचे निदान झाले. पेट स्‍कॅन केल्‍यानंतर यकृतातही कर्करोगाचा फैलाव झालेला असल्‍याचे समोर आले. नाशिकलाच उपचार घ्यायचा, की मुंबई गाठायची अशी द्विधा मनःस्थिती निर्माण झाली होती. त्‍यातच कर्करोग तज्‍ज्ञ डॉ. शैलेश बोंदार्डे यांच्‍याकडे उपचारासाठी त्‍या गेल्‍या. (Suvarna Chavanke overcomes Cancer with support of her family Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: ‘Nirbhaya’ गस्त पथकांची करडी नजर; दिवस-रात्र महिला सुरक्षिततेसाठी गस्त

त्‍यांना बघताक्षणी व संवाद साधत असताना कर्करोगाविषयीची संपूर्ण भीती निघून गेली. पुढे केमोथेरपीच्‍या सोळा सायकल घेताना त्‍यानंतर शस्त्रक्रिया करत गाठ काढण्यात आली. या आव्‍हानाच्‍या काळात पती, मुलगा, आई व बहिण यांची अत्‍यंत खंबीर साथ मिळाल्‍याचे सौ. चव्‍हाणके सांगतात. या कठीण काळात डॉ. बोंदार्डे व श्रुती पाटील व रुग्‍णालयातील संपूर्ण टीममधील सदस्‍य, कर्मचाऱ्यांनी मनोबल वाढविली.

डॉक्‍टरांवर दाखविलेला विश्‍वास त्‍यांनी सार्थ ठरविला. आत्‍मविश्‍वासाने कर्करोगाचा मुकाबला करण्याचा निर्धार केला होता. हा आत्‍मविश्‍वास उपचार कालावधीत हिं‍मत वाढविणारा ठरला. सोबत खडतर वेळेत देवाची केलेल्‍या प्रार्थनेतून प्रोत्‍साहन मिळाले. कर्करोगावर मात केल्‍यानंतर आता मॉर्निंग वॉक, योगाभ्यासात सातत्‍य ठेवत सुदृढ आयुष्य जगत असल्‍याचेही सौ. चव्‍हाणके यांनी सांगितले.

हेही वाचा: Crime Update : Product Adचे आमिष दाखवून महिलेची 5 लाखांची फसवणूक