Upcoming Marathi Song : सुवनमल्हार स्टुडिओज् चे 'मन बावरलयं...' लवकरच T- Series कडून होणार प्रदर्शित!

Suvarnamala Studios Mann Bawarle marathi song will soon be released by T Series nashik news
Suvarnamala Studios Mann Bawarle marathi song will soon be released by T Series nashik newsesakal

Upcoming Marathi Song : सुवन मल्हार स्टुडिओचे मन बावरलय हे मराठी गाणे येत्या 10 जुलै रोजी टी सिरीज तर्फे प्रदर्शित होत आहे. या गाण्याची पत्रकार परिषद हाॅटेल वास्तु वाडा गंगापूर रोड येथे पार पडली. (Suvarnamala Studios Mann Bawarle marathi song will soon be released by T Series nashik news)

टी सिरीज आणि सूवन मल्हार स्टुडिओ चे मन बावरलय हे मराठी गाणे येत्या 10 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या माणसांवरच प्रेम आणि काहीतरी नवीन करण्याची धडपड यातून कलेला मिळालेला वाव, सहा. प्राध्यापक ते थेट टि - सिरीज चा गीतकार या खडतर प्रवासाचा धनी आज सर्वत्र आपल्या सुवनमल्हार नावाने ओळखला जातोय,आणि हे वाखाणण्याजोगे आहे असे प्रतिपादन कतृत्वांगन सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. किर्ती निकम जाधव यांनी केले, टि-सिरीज च्या प्रेस काॅन्फरन्स वेळी त्या बोलत होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रेस काॅन्फरन्स वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गीतकार संगीतकार पंडित धनंजय धुमाळ, सिनेअभिनेत्री प्रिया सुरते, सुप्रसिद्ध गायिका सीमा जाधव आणि पत्रकार बंधू उपस्थित होते.

ह्या गाण्याचे गीतकार, संगीतकार सुवन असुन गाण्याचे निर्माते सुवनमल्हार आहेत. गाण्याचे दिग्दर्शन डॉ. उमेश सोनावणे यांनी केले आहे. गायक आहेत अनिकेत जाधव आणि गौरी तिडके. शुभम घमंडी, प्रितई, देवरे, मल्हार आणि विदुला यांनी काम केले आहे.

या गाण्याचे छायांकन, संवाद देशमुख यांनी केले आहे. फोटोशूट प्रथम माळवदे यांनी केले आहे. पल्लवी ब्राम्हणकर सह निर्मात्या आहे तर उर्मीला वाघ यांनी रंगभुषा केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com