एसव्हीकेएम गरबा उत्सव

एसव्हीकेएम गरबा उत्सव
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. -- फोटो क्रमांक : 33501 धुळे : एसव्हीकेएम स्कूलमध्ये झालेल्या रास गरबा उत्सव प्रसंगी दीपप्रज्वलन करताना संजय अग्रवाल. शेजारी प्राचार्या सुनंदा मेनन, डॉ. हर्षल साळुंखे, डॉ. समीर गोयल, सुनील गुप्ता आदी. -- एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलमध्ये गरबा महोत्सव -- परंपरा आणि आधुनिकतेच्या संगमाने आधारित नेत्रदीपक सोहळा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : भारतीय संस्कृतीचा सुगंध, भक्तीचा भाव आणि गरब्याचा उत्साह यांचा सुरेख संगम अनुभवत एसव्हीकेएम सीबीएसई स्कूल येथे रास गरबा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम या संकल्पनेवर आधारित या उत्सवाने शाळा परिसर आनंदमय आणि चैतन्यमय झाला होता. - माता दुर्गा पूजा व आरतीने सुरुवात झाली. एसव्हीकेएम धुळे कॅम्पस चेअरमन संजय अग्रवाल उपस्थित होते. शीतल शाह, साक्षी योगेश संघवी, कुलसचिव डॉ. हर्षल साळुंखे, आयओपीचे प्राचार्य डॉ. समीर गोयल, परीक्षा नियंत्रक सुनील गुप्ता, एस.एन.जी.यू. धुळे वाणिज्य विद्याशाखेचे डीन डॉ. श्रीप्रकाश सोनी, शाळेच्या प्राचार्या सुनंदा मेनन व्यासपीठावर उपस्थित होत्या. साक्षी योगेश संघवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पारंपरिक, इंडो-वेस्टर्न तसेच रंगीबेरंगी गरबा वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी गरब्याच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य केले. - गरबा रासमध्ये सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. पालक आयोजक मंडळाच्या श्वेता राठोड, सोनल नाशिककर, पूजा भन्साली, प्रियांका गिंदोडिया, प्रीती खंडेलवाल, मोनिता अग्रवाल, पूनम अरोरा, नम्रता अग्रवाल यांनी सहकार्य केले. प्राचार्या सुनंदा मेनन यांच्या मार्गदर्शनात स्नेहा सैनी व स्वेतल पाठक यांनी समन्वय साधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com