धुळे स्वाधार योजना

धुळे स्वाधार योजना
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- ‘स्वाधार’द्वारे विद्यार्थ्यांना ५० ते ८० हजार रुपये - धुळे, नंदुरबारमध्ये आठ शासकीय वसतिगृहांची नोंद; ६६७ विद्यार्थी प्रवेशित - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात वाढ करण्यात आली आहे. शिक्षणाच्या ठिकाणानुसार पात्र विद्यार्थ्यांना ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेता याव्यात, हा योजनेचा उद्देश आहे. अकरावी, बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड संलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते. - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या उपलब्ध जिल्हानिहाय नोंदीनुसार धुळे जिल्ह्यात मुलांसाठी तीन आणि मुलींसाठी दोन, अशी एकूण पाच शासकीय वसतिगृहे आहेत. २०१५- २०१६ च्या आकडेवारीनुसार या वसतिगृहात २४८ मुले आणि १४४ मुली, असे एकूण ३९२ विद्यार्थी प्रवेशित होते. नंदुरबार जिल्ह्यात मुलांसाठी दोन आणि मुलींसाठी एक, अशी एकूण तीन वसतिगृहे आहेत. तेथील २०१५- २०१६ च्या नोंदीनुसार १५५ मुले आणि १२० मुली, असे एकूण २७५ विद्यार्थी प्रवेशित होते. अशा प्रकारे दोन्ही जिल्ह्यातील आठ वसतिगृहांमध्ये एकूण ६६७ विद्यार्थी प्रवेशित असल्याची नोंद आहे. - स्वतंत्र अनुदान स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानाव्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी दरवर्षी आठ हजार रुपये, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना चार हजार रुपये एकरकमी देण्यात येतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे, शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी पात्र असणे आणि अर्ज करूनही प्रवेश न मिळालेला असणे आवश्यक आहे. - १४-१ ...चौकट... १४-१ अनुदानाची अशी तरतूद... शिक्षणाच्या ठिकाणानुसार वार्षिक अनुदानाचे दर वेगवेगळे आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड आणि नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना ८० हजार रुपये, तर इतर महसुली विभागातील शहरे आणि उर्वरित ‘क’ वर्ग महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ६८ हजार रुपये मिळतात. इतर जिल्ह्यांची ठिकाणे तसेच महापालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ५७ हजार रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५० हजार रुपये वार्षिक अनुदानाची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com