धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H34371
धुळे : पालेशा महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय संस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांसह मान्यवर.
---
पालेशा महाविद्यालयात संस्कार शिबिर
---
एकदिवसीय शिबिर; ३५ विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित मा. ध. पालेशा वाणिज्य आणि कला व विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद संस्कार परीक्षा व एकदिवसीय शिबिर नुकतेच झाले.
युवकांमध्ये उत्तम चारित्र्य, बौद्धिक विकास, मानसिक उन्नती आणि नैतिक नेतृत्वगुणांचा विकास घडवून आणत राष्ट्रनिर्माणात हातभार लावण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयातील एकूण ३५ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. केंद्र चलो, नमस्ते जी, चरण स्पर्श, टिळक टाळी, टॅंक युद्ध, पेंदुलम आणि शेर हू मै शेर यांसारखे विविध आकर्षक मैदानी खेळ घेण्यात आले. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्याला चालना देण्यासाठी स्वामी विवेकानंद विचार मंथन सत्रही राबविण्यात आले. यात विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व व वर्तमान काळातील त्यांची प्रासंगिकता यावर चर्चा करण्यात करण्यात आली.
नेतृत्व शिबिरासाठी निवड
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचे व सहभागाचे मूल्यमापन करण्यात आले. श्री. बोरसे आणि देवगिरी प्रांताचे श्री. देशपांडे यांनी या शिबिरातून विशेष प्राविण्य मिळवलेल्या एकूण १२ विद्यार्थ्यांची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय युवा नेतृत्व शिबिरासाठी निवड केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शिबिरात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ. हेमंत जोशी, सहसमन्वयक प्रा. डॉ. कुशल चौधरी, स्वामी विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते कुलदीप पवार, चेतन देवरे, निल सोठी, श्रीमती वैष्णवी यांनी विशेष परिश्रम घेतले.
---