पान चार
३३६५१
नाशिक : गंगापूर रोड येथील स्वरांजली संगीत संध्येत रसिकांशी संवाद साधताना पालकमंत्री गिरीश महाजन, सोबत आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार व इतर मान्यवर.
-------------
कोजागरीवर ''स्वरांजली''ने नाशिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २७ : कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानावर आमदार सीमा हिरे आणि तुळजाभवानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ''स्वरांजली'' संगीत संध्या नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरली. या सोहळ्याला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विशेष उपस्थिती लावत आमदार सीमा हिरे यांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले.
पालकमंत्री महाजन म्हणाले, आमदार हिरे नाशिककरांसाठी नेहमीच दर्जेदार सांस्कृतिक पर्वणी घेऊन येतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला खानदेश महोत्सव, वैचारिक अधिष्ठान देणारी स्व. पोपटराव हिरे व्याख्यानमाला आणि दसऱ्यानिमित्त होणारे रावण दहन या उपक्रमांची नाशिककर वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. स्वरांजली सारख्या कार्यक्रमांमधून त्या शहराला कला, संगीत आणि संस्कृतीचा आनंद देत असून शहराच्या सांस्कृतिक परंपरेला ऊर्जा मिळत आहे. इंडियन आयडॉल फेम गायिका श्वेता दांडेकर, सुरभी गौड आणि गायक अर्जुन तांबे यांनी शास्त्रीय सुरांपासून ते आजच्या लोकप्रिय गीतांपर्यंत बहारदार सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमास भाजपचेमहेश हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, योगेश हिरे, मनपा गटनेते ॲड. श्याम बडोदे, रश्मी हिरे, सभापती बाळकृष्ण शिरसाठ, समाधान देवरे, अभय छलानी, नगरसेवक सुरेश पाटील, स्वाती भामरे, उषा बेंडकोळी, प्रतिभा पवार, मानसी शेवरे, सोनाली भंदूरे, भगवान दोंदे, डॉ. वैभव महाले, गौरव बोडके, अशोक पवार, महेंद्र पाटील, यशवंत पवार उपस्थित होते.