ओझर- ओझर नगर परिषद हद्दीतील थकीत करवसुलीच्या मोहिमेला वेग आला असून, प्रशासनामार्फत कर चुकवेगिरी करणाऱ्यांची मालमत्ता ‘सील’ केली जात आहे. मागील आठवड्यात भाडे थकीत असलेले गाळे ‘सील’ करण्यात आले..मंगळवारी (ता. १८) शेतीसाठी पालखेड पाटबंधारे विभाग पाणीवाटप संस्थेंतर्गत असलेल्या जय योगेश्वर पाणी वाटप संस्थेकडे सात ते आठ वर्षांपासून थकीत मालमत्ता कर थकबाकी असल्याने प्रशासनातील कर अधिकारी प्रशांत पोतदार व कर्मचाऱ्यांनी संस्थेचे कार्यालय ‘सील’ केले..आर्थिक वर्ष जवळ येत असल्याने वसुलीची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. नगरपरिषद वर्षभर सेवा देऊनही अनेक नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी ''अॅक्शन मोड''वर आले आहेत.पाणीपट्टी, मालमत्ता कर तसेच गाळे भाडे घरपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची तसेच मालमत्ता सील करण्याची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत आपल्या थकीत व चालू घरपट्टी, पाणीपट्टी व व्यावसायिक कराची रक्कम वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे..दरवर्षी करवसुली आणि विविध माध्यमातून मिळणारे उत्पन्न हाच नगरपालिकेचा वर्षाचा गाडा हाकण्याचा हक्काचा फंड (निधी) असतो. शहराचा झपाट्याने विस्तार वाढला असून नगरपालिकेने शहरात विभागनिहाय वसुली पथके नेमली आहेत.नवीन आर्थिकवर्ष सुरू होताच वर्षभराची मालमत्ता कर व पाणीपट्टी तसेच गाळे भाडे पट्टीच्या पावत्यांचे वाटप करूनही थकबाकीदार पाहिजे तसा प्रतिसाद देत नसल्याने मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी प्रशांत पोतदार करनिरीक्षक अनिल बोरसे, संदीप कमोद, नितीन संदानाशिव, महेंद्र जाधव आदींचे पथक वसुलीसाठी तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील वेळेत कर भरण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून केले आहे..शासनाने गाळा भाडे पाणीपट्टी तसेच विविध प्रकारच्या मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिलेले असल्याने त्यावरच नगरपरिषदेच्या विविध निधीचे गणित अवलंबून असते. शहराच्या विविध गरजाही या निधीतून भागवायच्या असतात. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरून सहकार्य करावे व कटू कारवाई टाळावी.- किरण देशमुख, मुख्याधिकारी, ओझर नगर परिषद.पाणी वाटप संस्था शासकीय जागेत असून थकीत कर भरण्याबाबत वरिष्ठांशी बोलणे झाले असून लवकरच कर भरण्यात येईल.- रवींद्र जोशी, लिपिक, जय योगेश्वर पाणीवाटप संस्था.मार्चअखेरनंतरही थकबाकी राहिल्यास नगर परिषदेमार्फत दंडात्मक व कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी आपल्याकडे असलेली मालमत्ता व पाणीपट्टी व इतर करांची थकबाकी लवकरता लवकर भरून सहकार्य करावे.- प्रशांत पोतदार, कर अधिकारी, ओझर नगर परिषद .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.