फोटो-22953
वावी ः तलवार हातात घेऊन दहशत माजविणारा प्रज्ज्वल वाकचौरे याच्यासह त्याच्यावर कारवाई करणारे पोलिसांचे पथक.
तलवार हातात घेऊन
दहशत माजविणारा ताब्यात
सिन्नर, ता. ४ ः तालुक्यातील शहा येथे तलवार हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या एकास वावी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर अवैध शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, शिवीगाळ करण्याचा गुन्हा दाखल आहे.
प्रज्ज्वल नवनाथ वाकचौरे असे संशयितांचे नाव आहे. पोलिसांनी त्याचे वडील नवनाथ चंद्रभान वाकचौरे यासह अटक केली. संशयितांच्या शेतातील त्याच्या पाइपलाइनला गळती असल्याने फिर्यादी बाळासाहेब शिंदे यांच्या शेतात पाणी येत होते. त्यामुळे शिदे यांनी वाकचौरे यांना पाईपलाईन दुरुस्त करुन घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने प्रज्ज्वल याने घरात असलेली तलवार आणून शिवीगाळ केली. एकालाही जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली. हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केली. याबाबत शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर संशयित प्रज्ज्वल व त्याचे वडील नवनाथ वाकचौरे या दोघांना पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले. दोघांवर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाकाली उपनिरीक्षक पटेल, हवालदार शहाजी शिंदे, कोळपे, गणेश पवार अधिक तपास करत आहेत.
.......