Protest
sakal
नाशिक: कालबाह्य लॅपटॉप बदलून नवीन लॅपटॉप प्रिंटरसह उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी राज्यातील १५ हजार तलाठ्यांनी एल्गार पुकारला आहे. बहुतांश जिल्ह्यांत तलाठ्यांनी सोमवारी (ता. १५) त्यांच्याकडील लॅपटॉप हे जिल्हा प्रशासनाकडे जमा केले. परिणामी, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी महसूल विभागाचे ऑनलाइन कामकाज ठप्प पडले. यामुळे सर्वसामान्यांची परवड झाली.