नाशिक- विभागामधील पाचही जिल्ह्यांतील एक हजार १६० ग्राममहसूल अधिकाऱ्यांना (तलाठी) स्वमालकीचे कार्यालय उपलब्ध नाही. त्यामुळे या तलाठ्यांना भाड्याच्या अथवा अन्य शासकीय कार्यालयांमधून गावाचा कारभार हाताळावा लागत आहे. तसेच मंडल अधिकाऱ्यांची परिस्थिती वेगळी नसून १५८ अधिकाऱ्यांना कार्यालयच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.