Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश
Tanisha Kotecha Shines at 29th Asian Youth TT Championship : उझबेकिस्तानमध्ये झालेल्या आशियाई यूथ टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या तनिषा कोटेचाने अंकुर भट्टाचार्यजीच्या जोडीने भारताला कांस्य पदक मिळवून दिले.
नाशिक- उझबेकिस्तान येथे नुकत्याच झालेल्या २९ व्या आशियाई यूथ टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचा हिने देशाला पदक जिंकून दिले आहे. भारताच्या अंकुर भट्टाचार्यजी याच्या साथीने मिश्र दुहेरीत तनिशाने कांस्य पदकाची कमाई केली आहे.