तनिष्का पेंढारकरचा गौरव

तनिष्का पेंढारकरचा गौरव
Published on: 
NSK26H34992 नंदुरबार : तनिष्का पेंढारकरचा गौरव करताना डॉ. राजेश वळवी. शेजारी मार्था सुतार, प्राचार्या नूतनवर्षा वळवी. --- बालनाट्य स्पर्धेत पेंढारकरला रौप्यपदक एस. ए. मिशनतर्फे गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव नंदुरबार, ता. १४ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २२ व्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तनिष्का नागसेन पेंढारकर हिने उत्कृष्ट अभिनय करून रौप्यपदक प्राप्त केल्याने एस. ए. मिशन संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, चेअरमन मार्था सुतार आणि एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. तनिष्काच्या या यशामागे तिची मेहनत, अभिनयाची आवड, सातत्यपूर्ण सराव आणि कलागुणांना प्रोत्साहन देणारे शाळेतील वातावरण यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही विशेष महत्त्व दिले जाते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य विविध व्यासपीठांवर सादर करण्याची संधी मिळत आहे, असे प्राचार्य वळवी यांनी या वेळी सांगितले. तनिष्काच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.