(पान ३ ला ॲंकर)
(तनिष्काचा लोगो घेणे)
SGR26B07589
सोनगीर : वेगवेगळ्या वेषभूषा करीत स्त्रीशक्तीचा जागर कार्यक्रमात उपस्थित महिला व तनिष्का सदस्या.
--------
‘तनिष्का’च्या माध्यमातून आदिशक्तीचा जागर
देवीच्या नवरूपांतून धार्मिक, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. १७ : महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या दैनिक सकाळच्या येथील ‘तनिष्का’ गटाने ‘आदिशक्ती जागर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्त्रीशक्तीचे सामर्थ्य प्रभावीपणे पटवून दिले. ४० महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. महिलांनी देवीच्या नवरूपांतून धार्मिक आणि देशभक्तीपर वेशभूषांचे सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली.
नवदुर्गा मातेची वेषभूषा साकारत तेजस्विनी गुजर, रुचिका चौधरी, रेणुका वाणी, हर्षदा पाटील, अक्षरा गुजर, भाविका गुजर, महिमा माळी, गायत्री लोहार, कनिष्का चौधरी यांनी शाबासकी मिळविली. देशातील कर्तबगार महिलांची वेषभूषा हर्षदा चौधरी, सिद्धी कासार, भाविता गुजर, हर्षाली चौधरी, सुलभा ईशी, निधी परदेशी, निहारिका पाटील, वेदिका गुजर यांनी साकारून लक्ष वेधून घेतले. रत्ना कासार, शोभा कासार, नीता कासार, सीमा कासार, वैशाली कासार, स्मिता कासार, संगीता सैदाणे, पूनम जोशी यांनी गोंधळ नृत्य सादर केले. वैशाली चौधरी, रुपाली चौधरी, मनीषा चौधरी, अनिता चौधरी,भारती चौधरी, पूजा सोनार, पूनम चौधरी, अनिता चौधरी यांनी जोगवा नृत्य सादर केले.
या उपक्रमासाठी जगदंबा माता गरबा मित्र मंडळाचे उदय कासार, धनंजय कासार, श्याम कासार, शेखर कासार, भूषण कासार, दिलीप कासार, अनिल कासार, विनोद कासार, गोविंद कासार, गोपाल कासार, जी. के. तांबट, रमेश कासार, सुरेश कासार, पद्माकर कासार, प्रफुल्ल कासार, मिलिंद कासार, दिलीप कासार, सोहन कासार, रुपम कासार, गौरव कासार, तुषार कासार आदींचे सहकार्य लाभले. उदय चंपालालशेठ कासार, रमेश पंडित कासार, श्याम पंढरीनाथ कासार यांच्या हस्ते ४० महिला व मुलींना भेटवस्तू देण्यात आल्या.
------
महिलांमधील एकजूट, संस्कृतीचे जतन
तनिष्का गटप्रमुख रुपाली माळी यांनी सूत्रसंचालन केले. सदस्या मनीषा कासार यांनी आभार मानले. तनिष्का समन्वयक सोनम ठाकूर, गटप्रमुख रुपाली माळी, मनीषा तांबट यांनी संयोजन केले. महिलांमधील एकजूट, संस्कृतीचे जतन आणि स्त्रीशक्तीचा जागर घडवून आणून तनिष्का सदस्य महिलांनी जमलेल्या दोनशेहून अधिक ग्रामस्थांची मने जिंकली.