शिरपूर: आरोग्य शिबिर बातमी

शिरपूर: आरोग्य शिबिर बातमी
Published on: 
SHC26B13451 खर्दे (ता. शिरपूर) : बालिकेची तपासणी करताना डॉ. संजय ओक. ----------- तपनभाई पटेल हॉस्पिटलमध्ये १०३ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया शिरपूर, ता. ६ : माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘जनसेवा उत्सव’ उपक्रमांतर्गत येथील तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज ॲन्ड रिसर्च सेंटरमध्ये १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान बालरोग शिबिरात दाखल ११६ पैकी १०३ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आयोजित शिबिरात नामांकित तज्ज्ञ, केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया केल्या. शिबिरासाठी एस.व्ही.के.एम. सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, हॉस्पिटल सीईओ डॉ. संतोष पवार आदींचे योगदान लाभले. याआधी दोन महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या बालरोग शस्त्रक्रिया शिबिरात डॉ. संजय ओक व त्यांच्या पथकाने ४५ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्या शिबिराला मिळालेला प्रतिसाद तसेच शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची संख्या लक्षात घेऊन अधिक व्यापक स्वरूपात शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात शिरपूर शहर व तालुक्यासह चोपडा, धुळे, जळगाव, नंदुरबार, साक्री, शहादा, शिंदखेडा, लासूर, विरवाडे, पिंपळनेर, यावल, मालेगाव, सांगवी, थाळनेर, विखरण, वडगाव, वकवाड, मध्य प्रदेशातील पानसेमल व खेतीया परिसरातून बालरुग्ण दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com