नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात तापसचे वास्तव्य

Bird
Birdesakal

नाशिक : नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात गेल्यावर्षी पहिल्यांदा ‘ब्लॅक बीटर्न'(काळा तापस) झेपावताना दृष्टीक्षेपात आला होता. यंदा चार पक्ष्यांनी दर्शन दिल्याने तापसचे इथे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. या अभयारण्यात लाल, पिवळ्यासोबत काळा तापसचा अधिवास आहे. (Latest Marathi News)

अभयारण्याच्या परिसरात गेल्या दोन दिवसाच्या पावसानंतर करण्यात आलेल्या पक्षीनिरीक्षणात काळा तापस हा पक्षी अभयारण्याच्या बाजूने वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या परिसरात आढळून आला. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकापासून पूर्वेकडे चीन, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया या उष्णकटिबंधीय आशियामध्ये पक्षाचा वावर दिसतो. २३ इंच लांबीचा हा पक्षी लांबलचक मान आणि लांब पिवळ्या रंगाची मान व एकसारखा काळा रंग ही त्याची ओळख करून देते. हे पक्षी झुडपांमध्ये अथवा झाडांमध्ये वेळूच्या ‘प्लॅटफॉर्म'वर घरटे बांधतात. तीन ते पाच अंडी मादी देते. कीडे,मासे हे त्यांचे आवडते खाद्य आहे. व्हिक्टोरियन फ्लोरा आणि फौना ग्यारंटी अ‍ॅक्ट (१९८८) नुसार हा पक्षी दुर्मिळ म्हणून सूचीबद्ध आहे.

Bird
कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांचे थवे

मलेशियातील एक पक्षी मणिपूरमध्ये सापडला. मालदीवमध्ये एक भारतीय पक्षी सापडला होता. त्यामुळे त्यांचे स्थलांतर होत असल्याचे अभ्यासात दिसून आले. नद्यांच्या वाढत्या खारटपणामुळे प्रजाती कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात हा पक्षी कमी प्रमाणात दिसतो.

''नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात काळा, पिवळा आणि लाल तापस हे तीन प्रकारचे ‘बीटर्न' दिसून येतात. पण या पक्ष्यांचा अभ्यास केला जात नाही. दरवर्षी पावसाळ्यात हे पक्षी परिसरात विन करतात. गोदावरी नदीच्या बाजूला पंधरा दिवसात चार ‘ब्लॅक बीटर्न' दिसले. तसेच कुकू या पक्ष्याच्या देखील नवीन जाती बघावयास मिळत आहे.'' - शंकर लोखंडे, गाइड

Bird
Optical Illusions: तुम्हाला फोटोमध्ये पक्षी दिसतात का? दृष्टी तपासा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com