Tapovan
sakal
नाशिक: तपोवन परिसरासह नाशिक शहरातील निसर्ग, झाडे आणि हरित क्षेत्रांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने तपोवन चळवळीतील पर्यावरणप्रेमींनी नाशिककरांना उद्देशून केलेल्या ठाम आणि स्पष्ट आवाहनाला उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. निवडून आल्यानंतर जो उमेदवार तपोवन तसेच नाशिकच्या निसर्गाचे संरक्षण करण्याची लेखी हमी देईल, त्यालाच मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत तब्बल ४७ उमेदवारांनी त्याप्रमाणे प्रतिज्ञापत्रे दिली.