Tapovan
sakal
नाशिक: एकही झाड तोडू देणार नाही, अशी माझी भूमिका नाही; परंतु या प्रक्रिया कायदेशीर व्हाव्यात, यासाठी मी आग्रही आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक झालेली नाही. येथे वृक्ष प्राधिकरण नाही, आयुक्तच प्रशासक आहेत, सर्व निर्णय घेणाऱ्याही आयुक्तच आहेत. अशी परिस्थिती असताना एक मोठी न्यायालयीन लढाई आपल्या सर्वांना लढावी लागणार आहे, अशी भूमिका ॲड. श्रीराम पिंगळे यांनी मांडली.