पान दोन
---------------
03173
तातापाणी : वनराई बंधारा साकारताना पंचायत समितीचे ग्रामरोजगार सेवकासह ग्रामस्थ.
तातापाणी, उंबरपाडा येथे
लोकसहभागातून वनराई बंधारा
सकाळ वृत्तसेवा
सुरगाणा, ता. १८ : तातापाणी, उंबरपाडा पी येथे ग्राम रोजगार सेवकांनी लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न:भूजल पातळी वाढवण्यास मदत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून पाणी टंचाईवर येणाऱ्या काळात मात करण्यासाठी तसेच भूजल पाणी पातळीत वाढ करण्यासाठी हातभार लागावा म्हणून तालुक्यातील ग्रामपंचायत गोंदुणे पैकी उंबरपाडा(तातापाणी)येथे व्ही.बी.जी. रामजी अंतर्गत ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने वनराई बधारा बांधण्याचे काम यशसवी रित्या पूर्ण करण्यात आले.पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग स्थानिक जलस्रोत्राचे पाणी पातळी वाढवण्यासाठी तसेच परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या उपलबधतेसाठी वाव्हा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वनराई बंधाऱ्याच्या कामासाठी तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक संजय मोरे, जयराम सहारे, विजय थोरात, पुंडलिक महाले, यशवंत चव्हाण, हिरामण वाघमारे, भाऊराव बंगाळ, गुलाब चौधरी, दीपक चौधरी, मंगळ भोये, हिरामण धुम, मोहन पवार, गणेश भोये, देविदास हाडळ, प्रभाकर आहेर, रामदास चौधरी, बिरबल राऊत, योगेश कामडी, शिवराम भोये, हिरामण चव्हाण, अनिल पवार, मोहन गांगुर्डे, मधुकर धुम, रामदास चोथवे, नामदेव भोये, यशवंत गावित, सुनिल पीठे, विष्णू वाघ आदींसह तालुक्यातील सर्व रोजगार साह्यकांनी या कामात सहभाग नोंदविला.