तौक्ते चक्रीवादळाचा द्राक्षवेलींना फटका; कोवळ्या फांद्या तुटल्या, शेतकरी चिंतेत

निफाड तालुक्यात लाॕकडाउनमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
Grape
GrapeSakal

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : तौक्ते चक्रीवादळाचा (tauktae cyclone) निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरीलाही मोठा दणका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक द्राक्षवेलींच्या कोवळ्या फांद्या तुटल्या आहेत. याशिवाय रात्रभर पाऊस पडल्याने उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षबागांच्या (vineyards) कोवळ्या फुटींनाही फटका बसणार आहे. (tauktae cyclone has damaged vineyards in Niphad Taluka Nashik)

निफाड तालुक्यात लाॕकडाउनमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. शेवटच्या टप्प्यात द्राक्षांना बाजारभाव बऱ्यापैकी मिळाला असला तरी अलीकडच्या काळात द्राक्ष उत्पादकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढलेल्या खतांच्या किमती, वाढलेली मजुरी, औषधांचा वाढता खर्च या सर्व परिस्थितीत द्राक्षउत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. कधी अवकाळी पाऊस, तर कधी कोरोनामुळे आर्थिक फटका, द्राक्षबागांना अत्यल्प भाव या सर्व परिस्थितीमुळे द्राक्ष बागायतदारांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे.

Grape
नाशिकला ५ लाख लसींची गरज; मुंबई, ठाणे महापालिकांकडे करणार मागणी

पुढील वर्षीच्या द्राक्षांची तयारी करत असतानाच आता पुन्हा तौक्ते चक्रीवादळाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्यास सुरवात झाली आहे. एप्रिल छाटणीनंतर द्राक्षबागांची विरळणी करणे, सबकेन करणे, काळी जातींच्या द्राक्षांची सुपर सबकेन करणे, बगल फूट काढणे ही कामे सुरू आहेत. उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षबागा आता फुटण्याच्या स्थितीत आहे. या सर्व द्राक्षबागांना वादळाचा व त्यामुळे निर्माण झालेल्या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. दीर्घ काळ ढगाळ हवामान राहिल्यास द्राक्ष काडीत गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात.

तौक्ते वादळाचा व त्यामुळे तयार झालेले हवामानाचा द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाचा सामना करण्यास आवश्यक असलेल्या औषधांची फवारणी करावी व द्राक्षबागांची काळजी घ्यावी.

-वासुदेव काठे, द्राक्षप्रयोग शेतकरी, कसबे सुकेणे

(tauktae cyclone has damaged vineyards in Niphad Taluka Nashik)

Grape
लसीकरणानंतर रक्तस्राव-रक्ताच्या गुठळ्या होण्याचे भारतातील प्रमाण अत्यल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com