Matin Patel Arrest: नगरसेवक मतिन पटेलला अखेर अटक; टीसीएस लैंगिक शोषणप्रकरणी संभाजीनगरात कारवाई

MIM Corporator Matin Patel Arrested by SIT: टीसीएसमधील लैंगिक शोषण व कथित धर्मांतर प्रयत्न प्रकरणात मुख्य संशयित निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना एसआयटीने छत्रपती संभाजीनगरातून अटक केली.
TCS Nashik Case

TCS Nashik Case

esakal

Updated on

नाशिक: बहुराष्ट्रीय टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आयटी कंपनीतील पीडितेवरील लैंगिक अत्याचार व धर्मांतरांचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयित, निदा खान हिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील ‘एमआयएम’चा नगरसेवक मतिन पटेल यास गुरुवारी (ता. सहा) रात्री अटक करण्यात आली. शहर पोलिस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com