टीसीएस प्रकरणास नवे वळण माजी खासदार इम्तियाज जलील आरोपीच्या पिंजऱ्यात !!

टीसीएस प्रकरणास नवे वळण माजी खासदार इम्तियाज जलील आरोपीच्या पिंजऱ्यात !!
Published on: 
पान-१--३ ------------ लोगो-- टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरण ------ फोटो वापरणे ः इम्तियाज जलील -----३६-४ धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील सहआरोपी ------------ निदा खानला मदत, आश्रय दिल्याप्रकरणी पुरवणी दोषारोपपत्र दाखल ------------ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.६ : टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास आता राजकीय वर्तुळातील व्यक्तींपर्यंत पोहोचला आहे. मुख्य संशयित निदा खान फरार असताना तीला छत्रपती संभाजीनगर येथे आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नावही पोलिस तपासात पुढे आले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांना सह आरोपी करत पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे आधीच राज्यभर चर्चेत असलेल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ----------------- राज्यभर गाजलेले शहरातील टीसीएसमधील धर्मांतराचे प्रकरणी देवळाली आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात संशयित निदा खान गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे ४० दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले. ती फरार असलेल्या काळात तिला मदत आणि आश्रय कोणी दिला, याचा तपास एसआयटीकडून सुरू होता. एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरमधील नगरसेवक मतीन पटेल यांचे नाव तपासात समोर आले होते. पोलिसांनी त्यांची स्वतंत्र पथकाद्वारे तब्बल सहा वेळा चौकशी केली. त्यांच्या जबाबातून इम्तियाज जलील यांच्याशी संबंधित माहिती पुढे आली आहे. त्यानंतर जलील यांच्याशी निदा खान आणि मतीन पटेल यांचा झालेला संपर्क, त्यांच्यातील संभाषण आणि परस्पर संबंधांची तपासणी करण्यात आली. मतीन पटेल यांच्याविरोधात यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता जलील यांच्याविरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणातील मुख्य संशयित दानीश शेख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. निदा खानसह अन्य नऊ संशयितांना जामीन मिळाला आहे. निदा खानने गर्भवती असल्याचे कारण देत जामीन मिळविला होता. दरम्यान, तिच्या पतीनेही वैवाहिक संबंध संपुष्टात आणण्यासाठी नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आता इम्तियाज जलील यांचे नाव दोषारोपपत्रात समाविष्ट झाल्याने त्यांना देखील न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ............. १६-१ आवाजाचे नमुने संकलित गेल्या दोन महिन्यांपासून इम्तियाज जलील यांचा भूमिकेबाबत पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे संकेत मिळत होते. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी निदा खान आणि मतीन पटेल यांचे मोबाईल फोन जप्त करून त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली. तपासणीत काही महत्त्वाची कॉल रेकॉर्डिंग हाती लागल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. जलील यांचे नाव तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचे आवाजाचे नमुनेही घेतले. संबंधित संभाषणांची पडताळणी आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे. जलील यांच्याविरोधात ठोस पुरावे उपलब्ध झाल्याचा दावा तपास यंत्रणेकडून केला जात आहे. ................ १६-१ तपासातील ठळक वैशिष्ट्ये - निदा खान आणि मतीन पटेल यांचे मोबाईल जप्त. - मोबाइलमधील संभाषणांची फॉरेन्सिक तपासणी. - काही महत्त्वाची कॉल रेकॉर्डिंग मिळाल्याचा दावा. - इम्तियाज जलील यांचे आवाजाचे नमुने संकलित. - जलील यांच्याविरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.