चांदोरी- मे आणि जून महिन्यातील सलग पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणे भरली आहेत. विशेषतः इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधारेने गंगापूर, दारणा, मुकणे आदी धरणांमधून विसर्ग सुरू झाला. गोदावरी नदीपात्रात जोरदार पाणी आले. हीच वेळ दर वर्षी गोदाकाठच्या गावांसाठी संकटाची असते.