धुळे : टुडे पान २ साठी..
--
धुळ्यात ‘एसआयआर’ कामावर
बहिष्काराचा शिक्षकांचा इशारा
--
तहसीलदारांकडून अपमान; पुरोगामी संघटनेचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविला जात आहे. या कामात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांशी धुळे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार फोनवरून अश्लाघ्य, अपमानकारक आणि एकेरी भाषेत बोलत असल्याचा आरोप महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केला आहे.
सदर अधिकारी शिक्षकांचे कोणतेही म्हणणे न ऐकता अपशब्दांचा शब्दांचा वापर करून शिक्षकांचा अपमान करत आहेत. तसेच महिला शिक्षिकांबरोबरही चुकीच्या आणि एकेरी भाषेत बोलतात. या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा ''एसआयआर''च्या कामावर बहिष्कार टाकला जाईल, असे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना देण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, महिला अध्यक्षा सुरेखा बोरसे, महिला सरचिटणीस प्रतिभा वाघ, तालुकाध्यक्ष निलेश राठोड, कार्याध्यक्ष ईश्वर बैसाने, महानगर सचिव ललित वाघ, महिला तालुका अध्यक्ष सुमन साळुंखे, सरचिटणीस भारती भादाने, गोरख पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.