Teachers Protest at Regional Education Office Nashik : नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यासह संपूर्ण विभागातून सुमारे ४०० हून अधिक शिक्षक विविध प्रश्न घेऊन उपस्थित होते.
नाशिक रोड: नाशिक विभागातील शिक्षकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या आणि कामकाजातील दिरंगाईविरोधात बुधवारी (ता.२१) नाशिक रोड येथील विभागीय उपसंचालक कार्यालयात झालेल्या शिक्षक महादरबार अक्षरशः उग्र वळणावर गेला.