अपघातातून बचावलेली शिक्षिका बनली उद्योजिका

जीवघेण्या अपघातातून आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या शिक्षिकेने मिळालेला पुनर्जन्म सार्थकी लावत संकटांना सामोरे जात स्वतःला सिद्ध केलंय पूनम सुनील देवरे यांनी
poonam Devare
poonam Devaresakal

जगण्याच्या वाटचालीत आलेल्या संकटांमुळे खचून न जाता अनेक जण स्वतःला सिद्ध करत असतात. जीवघेण्या अपघातातून आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या शिक्षिकेने मिळालेला पुनर्जन्म सार्थकी लावत संकटांना सामोरे जात स्वतःला सिद्ध केलंय पूनम सुनील देवरे यांनी.

माहेर तामसवाडी (ता.साक्री) शिक्षण बी.ए.डी.एड. वडील उत्तम नारायण अहिरराव यांच पत्नी ज्योती, मुलगी व मुलगी असं चौकोनी कुटुंब...गरीबी पाचवीलाच पुजलेली... सेंट्रींग कारागीर म्हणून कुटुंबाला आधार देत अहिरराव कुटुंबाने आपलं रोजचं जगणं सुरू ठेवलं होतं. मात्र जगण्याच्या लढाईत कुटुंबाला दोन घास पोटभर मिळावेत म्हणून थेट सटाणा गाठलं. मुलांनी शिकून मोठं व्हावं, यासाठी आई-वडिलांचे प्रयत्न सुरू होते. पूनमताई मुळातच हुशार... कुटुंबातील परिस्थितीची जाणीव असलेल्या पूनम यांनी डी. एड. ची पदवी मिळवली. याच काळात पूनम यांचा विवाह देवळा येथील सुनील दादाजी देवरे यांच्याशी २००७ मध्ये झाला. सुनील यांचंही वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होतं. सासरची परिस्थितीही जेमतेम...मात्र जिद्दीच्या जोरावर काहीतरी करण्याचा ध्यास घेतलेल्या पूनम आणि सुनील यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले होते.

शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण...

कुटुंबाला हातभार लागावा यासाठी ज्योती यांनी शिकवणी वर्गांबरोबरच देवळा येथील एका शाळेत २००८ मध्ये शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मात्र तुटपुंज्या पगारावर काम करीत आकडेमोड करताना दमछाक होत होती. याच काळात मुलगा नैतिक आणि कृष्णा यांच्यामुळे कुटुंबाची संख्या वाढली होती. शिक्षिकेची नोकरी असल्याने आयुष्यात चांगले दिवस येतील, असे स्वप्न समोर दिसत असतानाच ज्या शाळेत पूनमताई जबाबदारी पार पाडत होत्या, ती शाळाच बंद पडल्याने पुन्हा कुटुंबावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. जगण्याच्या लढाईतील संकटांची मालिका मात्र संपत नव्हती. शिक्षिका म्हणून नोकरी करत असताना याच काळात त्या रिक्षाने गणेश मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. २०१० मध्ये घडलेली दुर्घटना... देवळा ते सटाणा रस्त्यावर चार सहप्रवाशांसह रिक्षातून प्रवास करत असताना इंडिका कारने रिक्षाला धडक दिल्याने या अपघातात रिक्षातील चार प्रवासी जागेवर मृत झाले. मात्र, या जीवघेण्या अपघातातून पूनमताई आश्चर्यकारकरीत्या बचावल्या. येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

पतीची फसवणूक...

पती सुनील यांना बँकेत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून एकाने पैसे उकळले. मात्र नोकरी तर दूरच संबंधित व्यक्ती पैसे घेऊन फरारी झाली. आधीच जेमतेम परिस्थिती असलेल्या देवरे परिवारावर आलेला प्रसंग कठीणच होता. याच काळात पूनमताई यांनी शिकवणी वर्ग घेण्यास सुरवात केली. मात्र यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे. पती सुनील यांना भावांनी तसेच सासू- सासऱ्यांनी आधार देत या कठीण प्रसंगातून सावरले. पती कापड दुकानात सेल्समन म्हणून काम करू लागले ते आजतागायत.

नवा जन्म सार्थकी लागण्यासाठी सरसावल्या...

जीवघेण्या अपघाताचा प्रसंग आठवला तरी त्यांचे डोळे भीतीने पाणावतात या अपघातातून धडा घेत पूनमताई यांनी खचून न जाता आपली पदवी, शिक्षण बाजूला ठेवत कुटुंबासाठी सरसावल्या. पती सुनील यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा होता. मित्रपरिवार तसेच भाऊबंदकीच्या मदतीने कटलरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत घेतली. यातून स्वमालकीचे कटलरीचे छोटेसे दुकान उभे केले. प्रारंभी दिवसाकाठी १०० रुपये मिळणे अवघड होते. मात्र संयम राखत पूनमताई यांनी याच दुकानाला पुढे नेत आज स्वतःला सिद्ध केलंय. कुटुंबाला आधार देत असतानाच महिन्याकाठी खर्च वजा जाता कुटुंबासाठी मोठा आधार उभा राहिलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com