जिल्हा परिषद शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश

जिल्हा परिषद शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश
Published on: 
(पान १ ला ॲंकर) फोटो : NSK26H34769 मुंबई : येथे मंत्रालयात शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत शिक्षकांचे प्रश्‍न मांडतांना पुरूषोत्तम काळे. ----------- जिल्हा परिषद शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत बैठक सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ८ : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षणाच्या हिताच्या विविध प्रश्नांवर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने सादर केलेल्या निवेदनासंदर्भात मुंबई येथे मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह पुरूषात्तम काळे यांनी दिली. बैठकीत राज्यातील जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षकांची सर्व प्रकारची पदोन्नती प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करण्याचे निर्देश राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. प्रत्येक केंद्र शाळेवर डाटा एन्ट्री ऑपरेटर शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत शिक्षक व विद्यार्थी हिताच्या २८ मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यात आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची संच मान्यता, वस्तीशाळा शिक्षकांची सेवा, शिक्षक पात्रता परीक्षा, जुनी पेन्शन योजना, शिक्षकांना बीएलओ कामाची होणारी सक्ती, एसआयआर कामाच्या मानधनात वाढ, अर्जित रजेची नोंद, सेवा व पदोन्नतीविषयक प्रश्न, रिक्त पदांची भरती, वेतनश्रेणी, शाळा अनुदान, धोकादायक वर्गखोल्यांची पुनर्बांधणी, शाळेचे वीजबिल माफी, एकाच आवारातील दोन शाळांचे एकत्र व्यवस्थापन, मुख्याध्यापकांची रिक्त पदे, मुख्याध्यापकांना रजा रोखीकरणाचा लाभ, शिक्षण सेवकांच्या अंशदान योजनेतील कपात भविष्य निर्वाह निधीत वर्ग करणे, अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत नियुक्त ५९५ शिक्षकांची पूर्वीची सेवा ग्राह्य धरणे आदी विषयांवरही या वेळी चर्चा करण्यात आली. बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, उपसचिव मोईन ताशीलदार, शिक्षक परिषद प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे, प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, प्रांत संघटनमंत्री सुरेश दंडवते, प्रांत कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, रमेश क्षीरसागर, प्रांत प्रवक्ते दत्तप्रसाद पंडागळे, प्रांत सहकार्यवाह किशोर पिसे, महिला आघाडीप्रमुख वैशाली काकडे, सहप्रमुख सुरेखा ताजवे, गणेश पोतदार, देविदास सांगळे, अंकुश माळी, दीपक गिरासे, साईनाथ भालेराव, संजीव अहिरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.