Nashik Crime: शिक्षकच मोबाईल चोरतो तेव्हा...! कार्यालयातील CCTVत चोरीचा प्रकार कैद

Mobile Theft
Mobile Theftesakal

Nashik Crime : शिक्षकांमुळेच मुलांना चांगल्या वर्तणुकीचे धडे मिळत असल्याने आजही शिक्षकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. शिक्षकांना चांगले वेतनही असतानाही काही शिक्षक मात्र आपल्या कर्तव्याशी प्रतारणा करताना दिसतात.

आज तर एका शिक्षकाने मुंबई नाका परिसरात असलेल्या अधीक्षक, माध्यमिक वेतन व भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात कामानिमित्त आला असता, तेथील लिपिक महिलेचा मोबाईलच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या शिक्षकाचा मोबाईल चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. (teacher steals mobile theft caught on CCTV in office Nashik Crime)

रवींद्र पवार, असे मोबाईल चोरणाऱ्या शिक्षकांचे नाव असून, तो नांदगाव येथील एका खासगी शाळेत उपशिक्षक आहे. महामार्गावरील व्होकार्ट हॉस्पिटलसमोर असलेल्या अधीक्षक, माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात श्रीमती मीनल बावणे या वरिष्ठ लिपिक आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून या कार्यालयात माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे बँक खाते शालार्थमध्ये अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी (ता. १६) नांदगाव येथील कै. भागाबाई वामन हिरे माध्यमिक विद्यालय, कळमदरी या शाळेचे उपशिक्षक संशयित रवींद्र पवार हे कार्यालयात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mobile Theft
Crime on FB Live: जमिनीच्या वादातून वृद्ध शेजाऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव; क्रूरतेचं केलं फेसबुक लाईव्ह!

श्रीमती बावणे या कामकाज करीत असताना त्यांचा मोबाईल टेबल होता. त्या वेळी संशयित पवार याने श्रीमती बावणे यांचा मोबाईल त्यांची नजर चुकवून उचलला आणि मोबाईल स्वीचऑफ करून चोरून करून घेऊन गेला.

मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच श्रीमती बावणे यांनी अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये संशयित पवार हा मोबाईल चोरताना आढळून आला.

याप्रकरणी अधीक्षकांमार्फत मुंबई नाका पोलिसात तक्रार करण्यात आली असून, याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Mobile Theft
Crime : लग्नानंतर संसाराचं स्वप्न रंगवलं पण 7 दिवसांत सोनंनाणं घेऊन नवरी जुन्या बॉयफ्रेंडसोबत फरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com