पहिली ते बारावीच्या निवड श्रेणीचे आणि वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षणास सुरुवात..

पहिली ते बारावीच्या निवड श्रेणीचे आणि वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षणास सुरुवात..
Published on: 
पान दोन -------------- 08783 देवळा : येथील प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना डॉ.सुनील आहेर. पहिली ते बारावीच्या निवड, वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात अध्ययन-अध्यापनातील येणाऱ्या नवनवीन धोरणांबाबत माहिती देवळा, ता.१४ : इयत्ता पहिली ते बारावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे शुक्रवार १३ ते २२ नोव्हेंबर असे दहा दिवसांचे प्रशिक्षण विविध उपक्रम घेत येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात सुरू झाले आहे. ज्यांची शिक्षकसेवा बारा वर्षे आणि चोवीस वर्षे पूर्ण झाली आहे अशा शिक्षकांचा यात समावेश आहे. सदर प्रशिक्षण हे सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असून प्रशिक्षण काळात प्रत्येक तासाची हजेरी घेतली जाते आणि लगेच अपलोड केली जाते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्यामार्फत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. निवड श्रेणीचे आणि वरिष्ठ श्रेणीचे असे गट तयार करण्यात आलेले असून त्यात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. अध्ययन-अध्यापनातील नवनवीन धोरणांचा यात समावेश आहे. या प्रशिक्षणास मुख्याध्यापक डॉ.सुनील आहेर, केतन आहेर, वंदना भामरे, हेमंत महिरे, सोनाली भामरे, राकेश निकम हे सहतज्ज्ञ मार्गदर्शक कामकाज करत आहे. प्रशिक्षणाचे मुख्य समन्वयक गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव असून उपसमन्वयक म्हणून केंद्रप्रमुख पी.के.आहेर कामकाज पाहत आहे. तसेच विशेष तज्ञ मदतनीस म्हणून लक्ष्मण सूर्यवंशी हे कामकाज करत आहे. या प्रशिक्षणात तालुक्यातील ७६ शिक्षकाचा समावेश आहे. अशाच प्रकारचे प्रशिक्षण बागलाण, कळवण, मालेगाव, दिंडोरी, इगतपुरी, चांदवड या तालुक्यांमध्ये ही चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.