निवडश्रेणी प्रशिक्षणातून शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीला चालना! आर के एम विद्यालयात प्रशिक्षण

निवडश्रेणी प्रशिक्षणातून शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीला चालना!  आर के एम विद्यालयात प्रशिक्षण
Published on: 
पान दोन 09912 कळवण : वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना तेजश्री पवार समवेत प्रवीण वराडे, सतीश खंदारे आदी. आर.के.एम विद्यालयात निवडश्रेणी प्रशिक्षण सकाळ वृत्तसेवा कळवण, ता. १८ : तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन आर. के. एम. विद्यालय, कळवण येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत करणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे आणि आधुनिक अध्यापन पद्धतींची ओळख करून देणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षकांच्या सेवाविषयक प्रगतीमध्ये निवड श्रेणी प्रशिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक धोरणे, अध्यापनातील विविध कौशल्ये, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता आणि बदलत्या शैक्षणिक प्रवाहांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकारी तेजश्री पवार यांचे मार्गदर्शनावाखाली समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण वराडे, सतीश खंदारे, शीतल कोठावदे आदी प्रशिक्षणाचे काम पाहत आहेत सुलभक म्हणून केंद्रप्रमुख गणेश परदेशी, मयुरी पंडित,सोनाली चव्हाण, शरदचंद्र काकुस्ते, रेवती निकम, अभिनंदन धात्रक आदी काम करत आहेत. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख कांतीलाल बागुल, अनिता बागुल विशेष शिक्षक विजय पगारे , सागर ब्राह्मणकर, किरण भोये, नामदेव महाले ,जगन महाले ,योगिता फड,पूजा जाधव, शारदा पाटील परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.