इगतपुरी : विजय पगारे : आधुनिक काळात बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवावे - गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंडे :

इगतपुरी : विजय पगारे : आधुनिक काळात बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवावे - गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंडे :
Published on: 
पान दोन सेकंड मेन ------------------- 08953 वाडीवऱ्हे : प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना बाळासाहेब मुंडे. शेजारी मंजुषा साळुंके, अतुल आहिरे आदी. शैक्षणिक गरजांनुसार शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवावे बाळासाहेब मुंडे : वाडीवऱ्हेत वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सकाळ वृत्तसेवा इगतपुरी,ता.१८ : आधुनिक काळात बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना आपल्या ज्ञानात व अध्यापन कौशल्यात,व्यक्तिमत्व विकासात भर घालण्याची संधी मिळते. प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात वापरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंडे यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय वाडीवऱ्हे (ता.इगतपुरी) येथे तालुकास्तरीय वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रास प्रशिक्षणाचे समन्वयक तथा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंडे यांनी भेट दिली असता मार्गदर्शन करतां ना ते बोलत होते. प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, अभ्यासक्रम परिचय, भारतीय ज्ञानप्रणाली, शिक्षण हक्क कायदा, मूल्यांची रुजवणूक,शाळा मूल्यांकन, संवाद कौशल्य, शालेय संस्कृती, शिक्षक रजा नियमावली, २१ व्या शतकातील कौशल्ये, शासकीय योजना, शालेय अभिलेखे, शैक्षणिक संशोधन, माहितीचा अधिकार, सेवा हमी कायदा, मूल्यमापनाच्या विविध पद्धती, नेतृत्व विकास व प्रशासन, शालेय नियोजन, वर्ग निरीक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक वापर, व्यावसायिक शिक्षण, शिक्षकांचे स्वविकसन व सक्षमीकरण, कार्यालयीन लेखन कौशल्य आणि ताणतणाव व्यवस्थापन अशा विविध विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणादरम्यान विविध स्वाध्याय, प्रात्यक्षिके व सादरीकरणांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन केले जात आहे. --------- तालुक्यातुन १०७ शिक्षकांचा सहभाग या प्रशिक्षणात सहाय्यक समन्वयक मंजुषा साळुंखे,तर प्रशिक्षण सहाय्यक बाळासाहेब मुर्तडक,केंद्रप्रमुख विकास बोरसे हे जबाबदारी सांभाळत आहेत. वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी कन्हैया पगार, सचिन जोशी व भाऊसाहेब टोपे, तर निवड वेतनश्रेणीसाठी रावसाहेब पगार, अतुल अहिरे, बलराम माचरेकर, प्रमोद परदेशी व मनोज झांजरे हे सुलभक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. या प्रशिक्षणात वरिष्ठ वेतनश्रेणीचे ५९ आणि निवड वेतनश्रेणीचे ४८ असे एकूण १०७ शिक्षक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणासाठी माध्यमिक विद्यालय वाडीवऱ्हे शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.कापडणीस यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

इगतपुरी : विजय पगारे : Exclusive: संकलित मूल्यांकन चाचणीचे (पॅट-१) ) सुधारीत वेळापत्रक जाहीर : डिसेंबरच्या पहील्या आठवड्यात होणार राज्यभर परिक्षा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय :
इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरी तालुक्यात ऐन दुष्काळात आणि  दिवाळीच्या तोंडावर रेशनकार्ड बंद केल्याने गावांगावात नाराजी : आदिवासी बांधवांचेही  धान्य बंद :  पुरवठा विभाग,सेतू कार्यालयात नागरिकांची एकच गर्दी :
इगतपुरी : विजय पगारे : आशादायक : दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून साकारले आकर्षक आकाशकंदील : पणत्यांना दिली सुबक रंगांची सजावट :
इगतपुरी : विजय पगारे  : इगतपुरी तालुक्यातील बंद केलेले रेशनकार्ड पुर्ववत करा : ऐन सणासुदीच्या तोंडावर रेशनकार्ड रद्द झाल्याने नागरिक संतप्त : मनसेचे आत्मराम मते यांच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन :