

Nashik
esakal
येवला: शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत मिळणारी वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती आता कायमचीच थांबणार आहे. त्याऐवजी जिल्हा परिषदेसह खासगी १०० टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांना भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 'कॅशलेस' वैद्यकीय सुविधा मिळेल. या योजनेचा लाभघेण्यासाठी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट अर्थात आभा कार्ड काढण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.