येवला- वर्षभर ३६५ दिवस चालणाऱ्या आणि विविध उपक्रमांतून विद्यार्थी घडविणाऱ्या हिवाळी शाळेचा मोठा नावलौकिक आहे. या आदर्शवत कामाची माहिती घेण्यासाठी तालुक्यातील ५० वर प्राथमिक शिक्षकांनी या शाळेत जाऊन तेथील कामकाज अनुभवले. या शाळेतून अनेक गुण शिक्षकांना प्रेरणा देणारे ठरले.