मेनफिचर
जिल्हा टुडे पान तीनसाठी
---------------
(समर्पक एआय चित्र वापरावे)
-------
मुख्याध्यापकांवर ‘नोडल अधिकारी’चा भार
-------
ग्रामपंचायत अभियान; पुन्हा अशैक्षणिक कामे सोपवल्याने नाराजी
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. ३ : शिक्षकांना शैक्षणिक कामासाठी वेळ देण्याऐवजी त्यांच्यावर सातत्याने विविध प्रशासकीय व अशैक्षणिक कामांची जबाबदारी सोपविली जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. येथील पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी संबंधित गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची ‘पंचायत अभियान नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार, ग्रामीण विकासाला व पारदर्शक प्रशासनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम ग्रामपातळीवर राबविण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत संबंधित ग्रामपंचायतीशी समन्वय साधणे, आवश्यक कार्यवाहीसाठी संपर्क ठेवणे व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे यात नियुक्त नोडल अधिकाऱ्यांना कार्यवाही करावी लागणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
यांची झाली नियुक्ती
चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड, उपखेड, ओझर, करजगाव, कळमडू, कुंझर, कोदगाव, खडकी खुर्द, खडकीसीम, गणेशपूर, चिंचगव्हाण, चितेगाव, चैतन्यतांडा, जामडी प्र. ब., टाकळी प्र. चा., तरवाडे खुर्द यासह इतरही काही ग्रामपंचायतींसाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षकांना शिकवू द्या
शिक्षकांचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, अध्ययन-अध्यापनाची तयारी करणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे हे असताना त्यांच्यावर अशा प्रकारच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविल्या जातात. ज्यामुळे शाळेतील शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता शिक्षकांनी व्यक्त केली आहे. शासनाकडून शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्याबाबत वेळोवेळी निर्देश दिले जात असतानाच प्रत्यक्षात विविध अभियान, सर्वेक्षण, निवडणूक विषयक कामे, जनजागृती, प्रशासकीय समन्वय व इतर कामांची जबाबदारी शिक्षकांवर येत असल्याने ‘शिक्षकांना शिकवू द्या’ अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे.
--------------------
कोट
CSG26B02987 (सचिन पाटील)
शिक्षकांचे मूळ काम हे विद्यार्थ्यांना शिकविणे आहे. मात्र, वारंवार विविध शासकीय अभियानांची जबाबदारी शिक्षक व मुख्याध्यापकांवर सोपविली जाते. त्यामुळे अध्यापनासाठी मिळणारा वेळ कमी होत आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करून त्यांना केवळ शैक्षणिक कामासाठी वेळ देणे आवश्यक आहे.
- सचिन पाटील, माजी अध्यक्ष, शिक्षक समन्वय समिती, चाळीसगाव.
---------------
CSG26B02986 (भय्यासाहेब वाघ)
मुख्याध्यापक म्हणून शाळेचे शैक्षणिक नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासोबत ग्रामपंचायतीच्या अभियानासाठी नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी दिल्याने दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना अडचणी निर्माण होतील.
-भय्यासाहेब वाघ, मुख्याध्यापक, मेहुणबारे चौफुली जि. प. शाळा.
-----------------------पूर्ण