TET exam
sakal
नामपूर: शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दोन वर्षात उत्तीर्ण करावी अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबरला दिल्याने नोकरी सोडावी लागण्याच्या भीती शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.