YEO26B27231
येवला : स्वामी मुक्तानंद विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना गिरीजा महिला मंचच्या मार्गदर्शिका.
------------
किशोरवयीन विद्यार्थिनींना आरोग्याविषयी मार्गदर्शन
येवला ः गिरिजा महिला मंचतर्फे जनजागृती उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२२ ः येथील गिरिजा महिला मंचतर्फे स्वामी मुक्तानंद विद्यालयात किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी ‘किशोरावस्थेतील बदल : घाबरू नका, समजून घ्या’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमृत पहिलवान होते. स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे प्राचार्य सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपप्राचार्य विभुते, पर्यवेक्षक डी. एन. खैरनार आणि खजिनदार गायकवाड, वेलजाळी उपस्थित होते. प्रमुख व्याख्यात्या म्हणून बाभूळगाव येथील एस. एन. डी. नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. भारती बेलजाळी, राज्य गिरिजा महिला मंचच्या अध्यक्षा संगीता महाजन उपस्थित होत्या.
किशोरवयीन मुलींमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या वयातील शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांविषयी योग्य माहिती देण्यात आली. सविता शिरसाठ यांनी गीत सादर केले. डॉ. बेलजाळी यांनी किशोरावस्थेत मुलींमध्ये होणारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल यांविषयी सविस्तर माहिती दिली. या वयात होणाऱ्या बदलांना घाबरून न जाता ते समजून घेणे, आरोग्याची योग्य काळजी घेणे आणि आत्मविश्वासाने जीवनातील या महत्त्वपूर्ण टप्प्याला सामोरे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जयश्री राठोड यांनी स्वागत व व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. विजया हिरे यांनी प्रास्ताविक केले. प्रियंका ससे यांनी सूत्रसंचालन केले. रेखा बाविस्कर यांनी आभार मानले. मंचच्या संचालिका अंजली तांबे, रंजना मडके, स्वाती वारंगुळे, सोनाली आळंदीकर आणि अश्विनी सोनवणे, चित्र नागपुरे आदी उपस्थित होते.
--------------