सिन्नरच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ तेजस्विनी (तेजश्री) हेमंत वाजे

सिन्नरच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ  तेजस्विनी (तेजश्री) हेमंत वाजे
Published on: 
झेप तीच्या कर्तृत्वाची लागो वापरणे ---------------- 23148 तेजस्विनी वाजे समाजसेवा, सहकाराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा ध्यास ------- तेजस्विनी वाजे यांचा प्रभावी जीवनप्रवास संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १८ : तालुक्यात सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्रात आपल्या उत्तुंग कामातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे तेजस्विनी (तेजश्री) हेमंत वाजे. सामाजिक बांधिलकी, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची तळमळ आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची भावना या गुणांच्या जोरावर त्यांनी अनेक वर्षांपासून समाजासाठी अमूल्य योगदान दिले आहे. ''लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी'' आणि सिन्नर तालुक्यातील महिलांची अग्रगण्य संस्था असलेल्या ''सिन्नर तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या'' माध्यमातून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. लायन्स क्लबच्या ‘वुई सर्व्ह’ (आम्ही सेवा करतो) या ब्रीदवाक्याला अनुसरून तेजस्विनी वाजे यांनी विविध सामाजिक उपक्रमांत अत्यंत सक्रिय सहभाग घेतला आहे. मोफत नेत्रतपासणी, रक्तदान शिबिरे, कर्करोग जनजागृती आणि मधुमेह नियंत्रण यांसारख्या उपक्रमांतून हजारो नागरिकांना प्रत्यक्ष वैद्यकीय मदत मिळवून दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदमेळा आयोजित करून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा संवेदनशील प्रयत्नही त्यांनी केला. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना, विशेषतः वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी दररोज २ ते ३ किलोमीटर पायी पायपीट करावी लागते. विद्यार्थ्यांचे हे कष्ट लक्षात घेऊन तेजस्विनी वाजे यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून ‘सायकल बँक’ हा अत्यंत उपयुक्त उपक्रम राबवण्यास पुढाकार घेतला, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास सुकर झाला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून त्या ''सिन्नर तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या'' चेअरमन म्हणून यशस्वीरीत्या धुरा सांभाळत आहेत. लघुउद्योग, गृहउद्योग आणि विविध छोटे व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या गरजू महिला व तरुणांना सुलभ कर्जाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यात या पतसंस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे. माजी आमदार रुक्मिणीबाई वाजे यांनी आयुष्यभर केलेल्या सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा तेजस्विनी वाजे अत्यंत समर्थपणे पुढे नेत आहेत. उद्याच्या अंकात : ज्योती गांगुर्डे, कंधाणे (ता.मालेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com