Nashik Winter Update : निफाडला थंडीचा कडाका; पारा 7.4 अंशावर

गेल्या दोन-तीन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे निफाड तालुक्यातील थंडीच्या कडाक्याने घसरणारा पारा सध्या चिंतेचा बनला आहे.
A fire lit to ward off the cold.
A fire lit to ward off the cold. esakal

Nashik Winter Update : गेल्या दोन-तीन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे निफाड तालुक्यातील थंडीच्या कडाक्याने घसरणारा पारा सध्या चिंतेचा बनला आहे सोमवारी (ता. १५) ६.५ अंशावर असलेल्या वातावरणात थोडासा दिलासा मिळत मंगळवारी (ता. १६) ७.४ अंश वातावरण होते.

सध्या निफाड तालुक्यात द्राक्ष हंगाम सुरू होण्याची स्थितीत असताना, बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हबकला कला आहे. (temperature at 7.4 degrees in niphad nashik winter update news)

थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्याचे चित्र तालुक्यात आहे. तालुक्यात लवकरच द्राक्ष तोडणी हंगामाला सुरवात होणार आहे. काही ठिकाणी व्यापारी द्राक्षाचे दर ठरविणे सुरू असताना, अचानक वातावरण बदलल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. तरुण शेतकऱ्यांनी वाढत्या थंडीपासून द्राक्षांना वाचविण्यासाठी सोशल मीडियावरून सल्ले देण्यास सुरवात केली आहे. सध्याचे वातावरण गहू व हरभरा पिकांना पोषक आहे.

A fire lit to ward off the cold.
Nashik Winter Update : निफाडचा पारा घसरला; 6.5 अंश सेल्सिअस

''तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने विपरित वातावरणातून सध्या द्राक्ष बागा फुलविल्यात आहेत. मात्र, बदललेल्या वातावरणाने द्राक्ष बागायतदारापुढे संकट उभे केले आहे. त्याही परिस्थितीत बागा वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत आहेत.''-बाबूराव सानप, द्राक्ष उत्पादक, सोनेवाडी

A fire lit to ward off the cold.
Nashik Winter Update : तापमान घसरले, थंडी वाढली..! किमान 11.1 अंश तर कमाल तापमान 29.3 अंशांवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com