Nashik News: खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी! बांधकाम विभागाच्या ठेकेदारांना नोटिसा

Road Construction
Road Constructionesakal
Updated on

नाशिक : पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर दुरुस्तीसाठी १०४ कोटी रुपये खर्च केले.

परंतु खड्डे दुरुस्त करतानादेखील तात्पुरती मलमपट्टी केल्याची बाब उघड झाल्याने सहा विभागांतील खड्डे दुरुस्तीचे काम घेतलेल्या ठेकेदारांना बांधकाम विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Temporary bandage on potholes Notices to Contractors of Construction Department Nashik News)

महापालिकेच्या वतीने खड्ड्यांवर दर वर्षी करोडो रुपये खर्च केले जातात. गेल्या चार-पाच वर्षांत जवळपास दीड हजार कोटी रुपये रस्त्यांवर खर्च झाले आहेत. परंतु रस्त्यांवरील खर्चाचा विनियोग योग्य प्रकारे होत नसल्याचे दर वर्षी उघड होते.

या वर्षी देखील जवळपास अडीचशे कोटी रुपये रस्त्यांवर खर्च झाला. त्यानंतर दिवाळीत मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांचे पितळ उघडे पडले. पालकमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात कारवाईचा इशारा दिल्यानंतर बांधकाम विभागाने स्थायी समितीवर १०४.३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव १० ऑगस्टला सादर केला होता.

खड्डे दुरुस्तीची कामे देण्यासाठी विभागनिहाय ठेकेदार निश्‍चित करण्यात आले. काही भागात भरपावसात खड्डे बुजविले गेले. परंतु खड्ड्यातील मटेरिअल लगेचच बाहेर पडले. खड्ड्यांची कामे करण्याचा दिखावा करण्यात आला.

परंतु प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. प्रमुख रस्त्यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने कागदोपत्री दुरुस्ती दाखवून पैसे काढले जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या.

गुणवत्ता नियंत्रण विभागाने गुणवत्ता व नियंत्रण विभागामार्फत खड्ड्यांची तपासणी केली असता, त्यात त्रुटी आढळल्या. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारांना नोटीस काढून महापालिकेच्या निविदा अटी-शर्तीनुसार रस्ते दुरुस्तीची कामे करण्याची तंबी दिली आहे.

Road Construction
NMC News: कायमस्वरूपीच्या नावाखाली मानधनावरील डॉक्टरांकडून वसुली

विभागनिहाय खड्ड्यांवर झालेला खर्च (रुपयांत)

विभाग एकूण खर्च

पश्चिम २०.६४ कोटी

सिडको २०.१० कोटी

नाशिक रोड १८.९३ कोटी

पूर्व १४.९० कोटी

पंचवटी १४.५० कोटी

सातपूर १५.२३ कोटी

Road Construction
Nashik News: शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ करा! अमृता पवार यांचे कृषिमंत्र्यांना पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Parbhani
Residents and devotees claim the temporary repair has increased the risk of accidents and made travel more difficult.
Crumbling ₹21-Crore Road Raises Alarm Before Sant Tukaram Maharaj Palkhi
Infrastructure Development Slabs: Auditing the 197 Crore Investment Grid
Marathi News Esakal
www.esakal.com