नाशिक : तिप्पट पैसे करण्याचा मोह महागात; चौघांनी औरंगाबादच्या एकाला गंडविले

सात रुपयांचे २३ लाख रुपये करून देण्याचा लोभ एकाला चांगलाच महागात
temptation to triple pay is expensive Greed is very
temptation to triple pay is expensive Greed is very

नाशिक : सात रुपयांचे २३ लाख रुपये करून देण्याचा लोभ एकाला चांगलाच महागात पडला. सात लाख रुपये घेऊन आलेल्या एकाला चौघांनी लुटल्याचा प्रकार रामघाटावर घडला. रेणुका शिवदास दिवेकर (वय २७, दत्तमंदिर, फुलेनगर, पंचवटी), शिवाजी राघू शिंदे, तेजस ऊर्फ बंटी वाघ आणि योगेश ऊर्फ म्हसोबा क्षीरसागर, अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी रेणुका दिवेकर व शिवाजी शिंदे यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

औरंगाबाद येथील बुहराणी टॉवर येथील मोहीज फिदारी सैफी (वय ५३) यांना त्याच्या तोंडओळख असलेल्या एका महिलेने विश्वास संपादन करीत त्यांच्याकडे पैसे तिप्पट करून देणारी पार्टी आहे, असे सांगून नाशिकला बोलावून घेतले. त्यानंतर मोहीज यांनी महिलेला सात लाख रुपये तिप्पट करायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार महिलेने सात लाख रुपयांच्या बदल्यात २३ लाख रुपये मिळतील व त्यातील एक लाख कमिशन महिलेला द्यायचे, असे ठरले.

त्यानंतर तक्रारदार पैसे घेऊन नाशिकला आला. महिलेने तिचे काका म्हणून शिवाजी राघू शिंदे याला भेटले. महिलेने त्यानंतर तिप्पट पैसे करून देणाऱ्या पार्टीला फोन लावला. त्यांच्या फोनाफोनीनंतर मोईज सैफी, त्याचा मित्र व ती महिला, असे सर्व गाडगे महाराज पूल ते अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चटकमटक हॉटेलसमोर आले. तेथे त्यांना एकजण भेटला.

शुक्रवारी (ता. ११) रात्री साडेनऊला अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोहीज यांना पैसे दाखविण्यास सांगण्यात आले. त्यातन तवेरा गाडीतून आलेल्या लोकांनी त्यांच्याकडील सात लाख रुपये घेऊन त्याचे २३ लाख रुपये करून देतो, असे आमिष दाखवून पैसे घेऊन गाडीतून पळून गेले. फसविल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक पी. एस. देवरे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com