SGR26B07627
बुरझड : टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना माजी आमदार कुणाल पाटील. शेजारी अविनाश महाजन, योगेश पाटील व कार्यकर्ते आणि खेळाडू.
-------
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बुरझड येथे उद्घाटन
राज्यातील ४५ संघांचा सहभाग; ३१ हजारांचे पहिले बक्षीस
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. ३ : बुरझड ता. धुळे येथील जय बजरंग मित्र मंडळ आयोजित व छत्रपती क्रीडा मंडळाच्या सहकार्य प्राप्त राज्यस्तरीय टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत राज्यातील ४५ संघांनी सहभाग घेतला आहे. बाद पद्धतीने सामने होणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगेश पाटील, माजी उपसभापती एन. डी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विशाल पाटील, सोनगीरचे माजी सरपंच अविनाश महाजन, बुरझडचे सरपंच संतोष पाटील, माजी सरपंच जगन जाधव, धनराज पाटील, दत्तात्रय पाटील, युवराज बागूल, पंडित पाटील, चिमठावळचे सरपंच शरद पाटील, पोलिस पाटील एकनाथ पाटील, वडणेचे भाऊसाहेब पाटील, समाधान पाटील, साहेबराव पाटील, सुनील बोरसे, दिलीप पाटील, प्रभाकर पाटील, मंडळाचे अध्यक्ष बलराम पाटील, खंडू पाटील, शांतीलाल पाटील, शामराव पाटील, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांच्यातर्फे वडील दिवंगत झेंडू महाजन यांच्या स्मरणार्थ प्रथम बक्षीस ३१ हजार एक रुपये, योगेश पाटील यांच्यातर्फे दुसरे बक्षीस २१ हजार एक रुपये, एन. डी. पाटील, विशाल पाटील, संतोष पाटील यांच्यातर्फे प्रत्येकी ११ हजार एक रुपये तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे. बुरझडच्या सैनिक ॲकॅडमीच्या मैदानावर डे- नाईट पद्धतीने सामने सुरू झाले आहेत.