नाशिक - स्वातंत्र्यदिनी नाशिक जिल्ह्यात ध्वजवंदनाचा मान न मिळाल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गोंदिया जिल्ह्यातील ध्वजवंदनास नकार दिला.
त्यामुळे महायुतीतील पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला पोचल्याचे समजते. भुजबळ यांच्या नकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियाच्या ध्वजवंदनाची जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली.