Nashik Bytco Hospital : बिटको रुग्णालयात आता शासकीय दरानुसार चाचण्या | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Bytco Hospital latest marathi news

Nashik Bytco Hospital : बिटको रुग्णालयात आता शासकीय दरानुसार चाचण्या

नाशिक : महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात आता शासकीय दरानुसार चाचण्या होणार असून, त्यासाठी दिल्लीच्या स्टार इमेजिंग कंपनीने सिटीस्कॅन व एमआरआय मशिन आउट सोर्सिंगने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ मध्ये नाशिकमध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने सिटीस्कॅन व एमआरआय मशिन खरेदी करण्यासाठी निधी प्राप्त झाला होता. (Tests started in Nashik Bytco Hospital as per Government Rate from today nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Train Alarm Chain Pulling: धावत्या रेल्वेत साखळी ओढणाऱ्यांकडून 15 लाखाचा दंड

त्यानुसार महापालिकेने सिटीस्कॅन व एमआरआय मशिन खरेदी करून तपासण्या सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, स्थायी समिती व महासभेच्या कोर्टात चेंडू टोलवाटोलवी केली गेल्याने विलंब झाला. महापालिकेने नवीन बिटको रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन खरेदी करण्याचा अंतिम निर्णय घेतला. ३१ डिसेंबर २०१८ रोजी च्या स्थायी समितीच्या सभेत ठराव संमत करण्यात आला. सप्टेंबर २०१९ मध्ये पुरवठादार कंपनीला कार्यादेश दिले गेले व रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन बसविले.

कोरोना कालावधीमध्ये बिटको रुग्णालयात या मशिनचा चांगला फायदा झाला. त्यानंतर मात्र मशिन चालवण्याकरिता मनुष्यबळ नसल्याचे कारण देण्यात आले. आउट सोर्सिंग मशिन चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार दिल्ली येथील स्टार इमेजिंग कंपनीने दोन्ही मशिन चालविण्याचा निर्णय घेतला असून, महापालिकेला होकार कळविला आहे. त्यामुळे करोडो रुपयांची मशिन उपयोगात तर येईल असे त्याशिवाय गोरगरीब लोकांना कमी दरात विविध चाचण्या करणे शक्य होणार आहे.

३० ते ४० टक्के कमी दराने चाचण्या

सिटीस्कॅन व एमआरआय मशिनमार्फत केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे दर बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. महापालिकेमार्फत आउटसोर्सिंगने विविध प्रकारच्या चाचण्या करताना तीस ते चाळीस टक्के कमी दर राहणार आहे. स्टार इमॅजिन कंपनीला या माध्यमातून जितके उत्पन्न प्राप्त होईल त्याच्या ५० टक्के उत्पन्न महापालिकेकडे जमा करावे लागणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

हेही वाचा: Diwali 2022 : सप्तरंगातून उजळले रांगोळीचे सौंदर्य