Uddhav and Raj Thackeray
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असून, नाशिकमध्ये त्यांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शुक्रवारी (ता. ९) होणाऱ्या या सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित आवाज घुमणार आहे. त्यामुळे या सभेकडे नाशिककरांचे लक्ष लागून राहिले आहे.