Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarEsakal

Sudhakar Badgujar: ठाकरेंचे खंदेसमर्थक बडगुजरांना तडीपारीची नोटीस; ऐन निवडणुकीच्या काळात शहर पोलिसांची कारवाई

Sudhakar Badgujar: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खंदेसमर्थक व जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना शहर पोलीस आयुक्तालयाने तडीपारीची नोटीस बजावली आहे. बडगुजर यांनी नोटीस स्वीकारलेली नाही.

नाशिक : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खंदेसमर्थक व जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना शहर पोलीस आयुक्तालयाने तडीपारीची नोटीस बजावली आहे. बडगुजर यांनी नोटीस स्वीकारलेली नाही. मात्र यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान बडगुजर यांच्यावरील तडीपारीच्या कारवाईमुळे नाशिकच्या राजकीय वातावरणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

सुधाकर बडगुजर यांना २०१४ मधील सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. परंतु याविरोधात बडगुजर यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. याच प्रकरणात शहर परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी चौकशी करून बडगुजर यांना तडीपारी करण्यासंदर्भातील नोटीस बजावली आहे. अंबड पोलिसांनी बडगुजर यांना गुरुवारी (ता. ९) नोटीस बजावली.

यासंदर्भात बडगुजर यांनी समर्थकांसह पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेऊन नोटीसला उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली आहे. त्यावर उपायुक्त राऊत यांनी त्यांना आठ दिवसांची मुदत दिली आहे. यावेळी बडगुजर यांच्यासमवेत विलास शिंदे, डी.जी. सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Sudhakar Badgujar
Navneet Rana: ' तुम्हाला 15 मिनिट पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील...'; नवनीत राणांच्या वक्तव्यावरुन AIMIM आक्रमक

बडगुजर हे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख आहेत. तसेच, सध्या शहर-जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच, बडगुजर यांच्याविरोधात तडीपारीची नोटीस बजाविल्याने राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बडगुजर अडचणीत

गेल्या जानेवारी महिन्यापासून सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे दाख झाले आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेत डान्सपार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावरून एसआयटीमार्फत चौकशी करून बडगुजर यांच्याविरोधात गेल्या फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू आहे.

Sudhakar Badgujar
Lok Sabha Election: मतदान करा अन् मोफत मिळवा पोहे-जिलेबी, सिनेमाचं तिकीट.. कुठे मिळतायत या भन्नाट ऑफर्स? जाणून घ्या

पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली असून, ती स्वीकारली आहे. नोटीसीला उत्तर देण्यासाठी मुदत मागितली आहे. मात्र सदरची कारवाई ही राजकीय सुडभावनेतून केली जात असून जनता सूज्ञ आहे.

- सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरेगट)

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात बडगुजर यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. सदरचे प्रकरण हे निवडणुकीच्याच काळातील असल्याने त्यांच्यामुळे निवडणुकीत अशांतता निर्माण होऊ शकते. त्याअन्वये तडीपारीची नोटीस बजाविण्यात आली आहे. नोटीसीबाबत त्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.

- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन.

Sudhakar Badgujar
Rahul Gandhi : टेम्पो भरुन पैशांच्या आरोपांना राहुल गांधींचं उत्तर; मोदींना उद्देशून म्हणाले, वैयक्तिक अनुभव...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com