नाशिक- औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतरही महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशादर्शक फलकांवर नाव न बदलता तसेच ‘औरंगाबाद’ नाव कायम ठेवल्याने शिवसेनेने (उबाठा) आक्रमक भूमिका घेतली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा उपनेते सुधाकर बडगुजर यांनी दिला आहे.